Home » राज्य » जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सांगली शहरातील माळी गल्ली परिसरात सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून भिडे गुरुजी घरी निघाले होते. त्यावेळी अचानक भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला. भिडे गुरुजी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर धारकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

Post Views: 120 काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख सातारा -राष्ट्रीय काॅंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Live Cricket