जीवनात आनंद मिळविण्यासाठी खेळ खेळा–यशवंत गायकवाड
सातारा(प्रतिनिधी) -महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा येथील महिला महाविद्यालयात महाविद्यालयाच्या स्थापना दिनाच्या औचित्याने दिनांक २८ व २९ जुलै २०२५ रोजी कॅरम, बुद्धिबळ, योगा व सूर्यनमस्कार स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले.. याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष दत्ताजी थोरात,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंत गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय विधाते, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.शिवाजी पवार,डॉ.कल्याणी बारटक्के, शिंगटे मॅडम आणि सर्व विद्यार्थीनी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी श्री.यशवंत गायकवाड यांचे हस्ते क्रीडा स्पर्धेचे उदघाटन झाले तेंव्हा त्यांनी अनेक उदाहरणांचे दाखले देत जीवनात खेळ आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.. फक्त स्पर्धेसाठी खेळाची तयारी न करता आपल्या जीवनाच्या आनंदासाठी व उज्वल भविष्यासाठी आपण नियमित व्यायाम आणि खेळ खेळले पाहिजेत असे सुतोवाच त्यांनी केले.. मुलींनी तर आपल्या आईला घरकामात मदत केली पाहिजे व्यायाम हा आपण मनापासून करत असलेल्या कामातूनही होतो याची नोंद घेतली पाहिजे असे सांगून त्यांनी खेळांडूना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या वाणीला पूर्णविराम दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले तर उपस्थित्यांचे आभार प्रियांका मोरे यांनी मानले.तेंव्हा कॅरम खेळाचे प्रमुख पाहुण्यांच्या व प्राचार्याच्या हस्ते खेळूनच स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले..आणि कार्यक्रमाची सांगता झाली.





