जावली युवा प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड-पुणे १४ वा वर्धापनदिन विविध उपक्रमानी साजरा
केळघर -जावली युवा प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड-पुणे १४ वा वर्धापनदिन नुकताच विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यमुनानगर निगडी पुणे येथे वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विलो मॅथर चे जनरल मॅनेजर प्रकाश धनावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ .तपसाळकर , जावली युवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष आनंदा जुनघरे, नारायण धनावडे, साहेबराव जाधव, एकनाथ सपकाळ, ज्ञानदेव शेलार, अनिल दुंदळे, विठ्ठल रांजणे , दत्ताञय लोखंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये शिवप्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ व मनोगते व्यक्त करण्यात आले.
प्रतिष्ठाणने यावर्षी घेतलेला रक्तदानासारखा समाजहिताचा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे असे अध्यक्षीय भाषणामधे प्रकाश धनावडे म्हणाले. प्रतिष्ठाणच्या पाठीशी सर्व जेष्ठ मार्गदर्शक असेच ताकदीने उभे राहु असे .नारायण धनावडे यांनी सभासदांना आश्वासित केले. रक्तदानासाठी सर्व सभासद व महीला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व समिती सदस्य व सभासदांचे मोलाचे योगदान दिले. प्रतिष्ठाणच्या वतीने आतापर्यंत स्नेहमेळावे , क्रिकेट सामने, विद्यार्थी गुणगौरव , वृक्षारोपण, रक्तदान शिबीर हे कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात. व भविष्यातही वेगवेगळे उपक्रम राबविले जातील असे प्रतिष्ठाणतर्फे अध्यक्ष सागर धनावडे यांनी सांगितले.
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर धनवडे यांनी बोंडारवाडी धरण ( विजय जलाशय ) जो पर्यंत पूर्ण होत नाही व शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत प्रतिष्ठान कृती समितीच्या बरोबर कायम पाठीशी राहील असे सांगितले.
रक्तदानासाठी लाईफलाईन ब्लड सेंटर सोमाटणे फाटा, मावळ यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीरमधे ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले भविष्यात यामधे अजून नक्कीच वाढ होईल.कार्यक्रमासाठी जेष्ठ सभासद वसंत जुनघरे, शांताराम जुनघरे , महादेव शेलार, कृष्णा धनावडे, अजय धनावडे, नारायण ओंबळे, नवनाथ दळवी उपस्थित होते.
तसेच दिवसभरामधे युवा उद्योजक तानाजीभाऊ शिंदे, बापूसाहेब घोलप सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रंगनाथ पवार, यमुनानगर मधील जेष्ठ नागरिक संघचे सदस्य मिनार गजने, व सभासद बंधु , गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले संदीप रांगोळे व कोल्हापूर मित्र मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर चौगुले तसेच सातारा जिल्हा मित्र मंडळाचे सदस्य व इतर मान्यवरांनी शिबिरास भेट दिली . कार्यक्रमाचे नियोजन खजिनदार .प्रकाश शेलार, तसेच संदीप बेलोशे, सुभाष जुनघरे, राहुल जुनघरे, प्रशांत जुनघरे, दत्ता शेलार , दिपक उभे , विकास जुनघरे, सुधाकर जुनघरे, व सुमित जुनघरे, प्रशांत जुनघरे व प्रतिष्ठाणच्या युवा कार्यकर्त्यांनी केले. संघटनेचे सचिव महेंद्र पार्टे यांनी सूत्रसंचालन केले . साहेबराव जाधव यांनी आभार मानले.
