Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्राध्यापकांनी तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे :- डॉ. म्हस्के

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्राध्यापकांनी तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे :- डॉ. म्हस्के

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्राध्यापकांनी तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे :- डॉ. म्हस्के

सातारा : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), सातारा जिल्ह्याच्या वतीने धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे रविवार दि. २३ जून २०२४ रोजी ‘पदवी अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा चे नूतन कुलगुरू प्रोफेसर डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी १९८६ पासून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पर्यंतच्या शैक्षणिक धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. या सर्व शैक्षणिक धोरणांमध्ये कोणकोणत्या शिफारशी केलेल्या होत्या व त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली याविषयी मार्गदर्शन केले. प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञानात होणारे नवनवीन बदल स्वीकारून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत व सतत नावीन्याचा शोध घेऊन शिकत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. आर. के. चव्हाण यांनी प्राध्यापकांनी सातत्याने आपल्या विषयामधील होणारे बदल, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती याबद्दल प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.   

या कार्यशाळेमध्ये ‘विज्ञान विद्याशाखा श्रेयांक आराखडा’ याविषयी सातारा जिल्हा सुटा चे अध्यक्ष व विद्या परिषद सदस्य डॉ. राजेश निमट, ‘वाणिज्य विद्याशाखा श्रेयांक आराखडा आराखडा याविषयी कोल्हापूर जिल्हा सुटा अध्यक्ष डॉ.आर. जी. कोरबू व मानव्य विद्याशाखा श्रेयांक आराखडा याविषयी अधिसभा सदस्य प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रामध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींविषयी प्रश्नोत्तरे व शंका निरसन घेण्यात आले. 

या कार्यशाळेस सुटाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.आर. के. चव्हाण, प्रमुख कार्यवाह डॉ. ए. बी. पाटील, सिनेट सदस्य डॉ. मनोज गुजर, डॉ. ज्ञानदेव काळे, डॉ. शाहीन पटेल,प्रा. एन. के. मुल्ला, डॉ ईला जोगी, प्रा. एस.एम. मेस्त्री, प्रा.आर.आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. सतीश घाडगे, प्राचार्य डॉ. एस. एम. भोसले प्र. प्राचार्य डॉ. विजयराव सावंत, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विजय कुंभार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजन मोरे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील २०० पेक्षा जास्त प्राध्यापक उपस्थित होते.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सातारा जिल्हा सुटाचे कार्यवाह डॉ. केशव मोरे यांनी करून दिला. कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. शाहीन पटेल व प्रा. सौ. मीना चव्हाण यांनी केले‌. सातारा जिल्हा सुटाचे खजिनदार डॉ. ज्ञानदेव काळे यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket