Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी करार झाल्याची घोषणा केली आहे. युद्धबंदीची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराण यांनी १२ तासांसाठी शस्त्रविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली असून या काळात दोन्ही देश त्यांच्या अंतिम मोहिमा पूर्ण करतील. त्यानंतर हे युद्ध संपले आहे, असे अधिकृतपणे मानले जाईल.’

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ‘युद्धबंदीची सुरुवात इराणकडून होईल आणि त्यानंतर १२ तासांनी इस्रायलही युद्धबंदीला सुरुवात करेल. २४व्या तासाला, १२ दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल. युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील.’

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धबंधीनंतर आता इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी, सध्या युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही ‘करार’ झालेला नाही असे म्हटले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘इराणने वारंवार स्पष्ट केले आहे की, हे युद्ध इस्रायलने सुरू केले आहे. सध्या तरी, कोणत्याही युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत कोणताही ‘करार’ झालेला नाही. पण, जर इस्रायलने इराणच्या वेळेनुसार पहाटे ४ वाजेपर्यंत बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर, त्यानंतर हल्ले करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आमच्या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.’

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket