वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ‘इंटेल उन्नती’ चे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ कार्यान्वित

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ‘इंटेल उन्नती’ चे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ कार्यान्वित

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ‘इंटेल उन्नती’ चे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ कार्यान्वित

कौशल्याची वाढती तफावत भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाच्या समावेशावर लक्ष केंद्रित

संपूर्ण देशातील महत्वाकांक्षी उपक्रम ‘इंटेल उन्नती’ चे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव यशोदा मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणासोबतच कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावरती नेहमीच भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्यासाठी इन्स्टिट्यूट आवश्यक ते प्रयत्न करताना पाहायला मिळते. आज तांत्रिक क्षेत्रातील पदवीधर आणि आयटी उद्योगाच्या अपेक्षा यांच्यात कौशल्याचे अंतर वाढत आहे. भारताचा परिवर्तनाचा प्रवास सक्षम करण्यासाठी आणि कौशल्याची वाढती तफावत भरून काढण्यासाठी भारत सरकारने आणि विविध संस्थांनी गेल्या काही वर्षांत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सरकारने उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम वाढवण्याच्या गरजेवर भर दिला आहे ज्यामुळे प्राध्यापकांना अधिक सुसज्ज करणे आणि पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित डेटा-केंद्रित कौशल्ये आहेत.

शिक्षणावर लक्ष केंद्रित करून, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटेलने गेल्या 20 वर्षांत अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. नव्याने लाँच केलेला Intel Unnati Program, विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या गरजा आणि Intel च्या शिक्षणाच्या अजेंडाला पुढे ढकलणाऱ्या उद्योगाच्या अपेक्षांशी सुसंगत राहण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा प्रकारचा अभ्यासक्रम निर्माण करायचा असल्यास विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना देखील अध्ययवत शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. प्राध्यापकांना तंत्रशिक्षणामध्ये अधिक कुशल बनवण्यासाठी आणि तीच कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा फुगवटा त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारा असल्याचे जाणवते आहे. पदवी पदवी उत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील कौशल्यपूर्ण बनत नाहीत तोपर्यंत उद्योगांना अपेक्षित असणार कुशल मनुष्यबळ निर्माण करता येणार नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी कम्प्युटर सायन्स या सोबतच अभियांत्रिकीच्या सर्व विद्या शाखातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे नवनवीन तंत्रशिक्षणाचे ज्ञान प्राप्त होणार आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील इंटेल उन्नतीच्या या सेंटर ऑफ एक्सलन्स ला तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने भेट द्यावी आणि तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि प्रगती समजून घ्यावी असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

• भारताचा परिवर्तनाचा प्रवास सक्षम करण्यासाठी आणि कौशल्याची वाढती तफावत भरून काढण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या उपक्रमांपैकी हा एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.

• विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील छोट्या मोठ्या बदलांवर लक्ष केंद्रित करून उद्योगाच्या अपेक्षांशी सुसंगत राहण्यास मदत करणारा हा उपक्रम आहे.

तंत्रज्ञानाच्या समावेशावर लक्ष केंद्रित करून, Intel Unnati Program यशोदा टेक्निकल कॅम्पस साठी तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तंत्रशिक्षणाची व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याने कौशल्य आधारित विकास घडवून आणल्यास शिक्षणाच्या मुख्य उद्देशाची प्राप्ती करता येणे शक्य होईल. विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि कौशल्याची वाढती दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फलदायी ठरणार आहे.

प्रा.अजिंक्य सगरे – उपाध्यक्ष, यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket