Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर’वर सोमवारी शेतकऱ्यांसाठी ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन ; प्रमोद शिंदे यांची माहिती

किसन वीर’वर सोमवारी शेतकऱ्यांसाठी ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन ; प्रमोद शिंदे यांची माहिती

किसन वीर’वर सोमवारी शेतकऱ्यांसाठी ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन ; प्रमोद शिंदे यांची माहिती

दि. ८/६/२४ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांसाठी बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपुरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन या विषयावर ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, सतत बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम विशेषतः शेतीवर होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनीही त्यानुसार आपल्या शेतामध्ये बदल करणे गरजेचे आहे. याकरिताच किसन वीर कारखाना, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पुणे येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपुरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन या विषयावर ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेत पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे माती व पाणी चिकित्सालयचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पाडेगांव येथील ऊस संशोधन केंद्र विभागातील ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सुरज नलवडे, पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्रच्या प्राध्यापिका डॉ. ताई देवकाते उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील ऊस पिक कार्यशाळेच्या अध्यक्षस्थान भूषविणार असून सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे संचालक नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या या ऊस पिक कार्यशाळेकरिता किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानात पर्यावरणपुरक ऊसाच्या विक्रमी उत्पादन घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

Post Views: 43 कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम कर्करोगाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करत तज्ज्ञांनी केले

Live Cricket