देशभक्त किसन वीरआबांची जयंती कारखान्यावर होणार साजरी:प्रमोद शिंदे यांची माहिती
दि. २४/८/२०२४ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांची जयंती सोमवार (दि. २६) रोजी कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर यांची जयंतीदिनी कारखाना कार्यस्थळावर सकाळी दहा वाजता कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.
हा जयंतीचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर होणार असून वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.
