वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत कासवंड गाव तालुक्यात अग्रेसर- सरपंच जनार्धन चोरमले
अनावधानाने पडलेला कचरा म्हणजे, ‘गिळी मिळी आपचिळी’नव्हे.
भिलार प्रतिनिधी- भिलार, कासवंड येथील ‘झोळी’ खाजगी जागेत अज्ञानातुन अज्ञाताने टाकलेला कचरा त्या अज्ञाताने प्रामाणिकपणे उचलुन नेऊन त्याची विल्हेवाट लावली तरीही बाकिचा कचरा नाही उचलला म्हणुन रागाने प्रसार माध्यमांतून नव्याने घोषीत झालेले ‘राजबेरीचं गाव कासवंड’ गावची नाचक्की करण्यात येत आहे.
भिलार आखेगणी रस्त्यावर असलेले छोटेखाणी गाव कासवंड कृषी व पर्यटण क्षेत्रात नावारुपाला येत आहे. गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गावच्या विकासासाठी सदैव कृतिशील असतात. सर्वांच्याच सहकार्यामुळे गावाला विवीध पुरस्कार मिळाले आहेत. नियोजनबद्ध व कृतिशील आखणीत पंचक्रोशीतील इतर गावांच्या तुलनेत सुतभरही कासवंड गाव मागे नाही.
मागील आठवड्या पासुन विवीध प्रसार माध्यमांतून कासवंड गावची प्रत्यक्ष शहानिशा न करता दिशाभुल करणा-या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ज्या इसमाने हा कचरा टाकला होता त्याच्याकडुन उचलला गेला असुनही संबधित शेतमालकाने अवैचारीकपणे विवीध माध्यमांतून बातमी प्रसिद्ध करताना गावच्या लौकिकाचा विचार केला नाही.
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत आमचं कासवंड गाव तालुक्यात अग्रेसर आहे असं, मी कासवंड गावचा सरपंच या नात्याने अभिमानने सांगतो. माझ्या गावात पर्यटक आकर्षित होतात, ते केवळ येथील हाॅटेल व्यवसायीकांत असलेल्या स्वच्छता व निटनेटकेपणामुळेच. येथील भुमीपुत्र आज स्वयःपुर्ण व आत्मनिर्भर झाला आहे. तसेच प्रत्येक घराघरात व हाॅटेलवाल्यांना त्यांच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक कचरा कुंड्या बसवण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगीतले.
आज गावचा प्रत्येक भुमीपुत्र येणा-या पर्यटकाचे त्याच्याच मालकिच्या लाॅजवर राहण्याची व खान्याची सोय करत असल्यामुळे त्याला आर्थिक फायदा होत असुन त्याचा व त्याच्या कुटुंबियियांचा उदरनिर्वाह व उपजीविकेचे मार्ग सुकर झाला आहे. असे करताना थोडा फार कचरा होणारच हे कृमप्राप्त आहे. तरी त्याचं कुणीही भांडवल न करत एकमेकास समजुन घेण्यात शहाणपण आहे हेच सत्य आहे असं अधोरेखीत केले.
आपल्या गावाचा नावलौकिक कसा वाढेल यावर भर द्यावा विनाकारण गावची नालिस्ती होईल, अशी कृत्य टाळावीत. असे कासवंड गावच्या सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो.
