भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने पाचवा सामना जिंकत ही मालिका ३-१ च्या फरकाने टीम इंडियाने आपल्या नावे केली आहे. यासह टी-२० मालिका विजयाचा सिलसिला संघाने कायम ठेवला आहे.
भारताने दिलेल्या २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खूपच कमाल झाली. क्विंटन डीकॉकने वादळी फटकेबाजी करत रीझा हेंड्रिक्सच्या साथीने ३.३ षटकांत संघाला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. पहिल्या विकेटसाठी डीकॉक व हेंड्रिक्स यांनी ६९ धावांची भागीदारी रचली. यानंतर डीकॉक व ब्रेविस यांनी अर्धशतकी भागीदारी केली. बुमराहने डीकॉकला बाद केल्यानंतर टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलं. डीकॉकने ३५ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविस १७ चेंडूत ३१ धावा केल्या.
डेवाल्ड ब्रेविस बाद झाल्यानंतर फलंदाज फार काळ टीकी शकले नाहीत. मिलर १८ धावा करत बाद झाला. तर वरूण चक्रवर्तीने झटपट फलंदाजांना माघारी धाडलं. वरूणने हेंड्रिक्सला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने मारक्रम, लिंडे व डोनावन फरेरा यांना बाद केलं. तर बुमराहनेही महत्त्वाच्या २ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या व जसप्रती बुमराहने १-१ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने सामन्याची नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. संजूला गिलच्या उपस्थितीत संधी मिळाल्यानंतर त्याने संघाला शानदार सुरूवात करून दिली. संजू ३८ धावा तर अभिषेक ३४ धावा करत बाद झाला. यानंतर हार्दिक व तिलकने वादळी फटकेबाजी करत ४४ चेंडूत १०० धावांची भागीदारी रचली.
हार्दिकने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि २५ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. तिलक वर्माने ४२ चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ७३ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने ३ चेंडूत १० धावा केल्या. याशिवाय भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा ५ धावा करत स्वस्तात बाद झाला. इतर फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद २३१ धावा केल्या.



