अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » भारताची हरित वाहतुकीकडे मोठी झेप; जिंद–सोनीपत दरम्यान देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन सुरू

भारताची हरित वाहतुकीकडे मोठी झेप; जिंद–सोनीपत दरम्यान देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन सुरू

भारताची हरित वाहतुकीकडे मोठी झेप; जिंद–सोनीपत दरम्यान देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन सुरू

नवी दिल्ली : भारताने हरित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वेगाडी सुरू करण्यात आली.
ही हायड्रोजनवर आधारित ट्रेन भारतीय रेल्वेच्या तांत्रिक कौशल्याचा, संशोधनाचा आणि आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. या रेल्वेगाडीच्या शुभारंभामुळे भारत स्वच्छ, हरित आणि भविष्योन्मुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
भारतीय रेल्वेच्या अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मानले जात आहे. हायड्रोजन इंधनामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून, भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यानिमित्ताने भारत हायड्रोजन रेल्वे चालविणार्‍या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. ही रेल्वे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे यशस्वी उदाहरण असल्याचे मोदी यांनी सांगितले.

जिंद ते सोनीपत या ८९ किलोमीटर मार्गावर धावणारी ही रेल्वे दोन तासांत प्रवास पूर्ण करणार असून, १२ स्थानकांवर थांबणार आहे. ३,२०० अश्वशक्तीची ही जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे असून, दहा डब्यांची अशी जगातील सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे असल्याचा दावा मोदी यांनी केला. इतर देशांतील हायड्रोजन रेल्वेला तीन ते चार डबे असतात, तर भारताने दहा डब्यांची रेल्वे विकसित करून जगात वेगळी ओळख निर्माण केल्याचे ते म्हणाले.

रेल्वेच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य आणि तंत्रज्ञान जिंदमध्ये विकसित करण्यात आले असून, भविष्यात हायड्रोजन रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी नवीन कारखाने उभारले जातील, असेही मोदी यांनी सांगितले.

 इंजिनची क्षमता – ३,२०० अश्वशक्ती

 डब्यांची संख्या- १०

 वेग ताशी – ११० किमी

 प्रवासी क्षमता – २,६००

 उत्सर्जन – शून्य कार्बन; केवळ पाण्याची वाफ

 इंधन तंत्रज्ञान – हायड्रोजन फ्युएल सेल

या दौर्‍यात मोदी यांनी सुमारे १४,७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यामध्ये ९,६८० कोटी रुपये खर्चाचा १५७.९२ किलोमीटर लांबीचा दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग, अंबाला-कालाअंब चौपदरी महामार्गाचा समावेश आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket