महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » खेळा » क्रिकेट » भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, वैभव-आयुश ठरले विजयाचे हिरो

भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, वैभव-आयुश ठरले विजयाचे हिरो

भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, वैभव-आयुश ठरले विजयाचे हिरो

झीम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा आपली वर्चस्वाची मोहोर उमटवली. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला.

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 311 धावात ऑल आऊट करून सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकरवर नाव कोरले आहे. भारताने दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 311 वर ऑल आऊट झाली त्यामुळे भारताने हा सामना 100 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकला आहे. 

भारताचा हा सहावा वर्ल्ड कप विजय ठरला आहे.

भारताने इंग्लंडसमोर 412 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. इंग्लंडकडून बेन डॉकिन्स आणि जोसेफ मुरस सलामीला उतरले होते.पण जोसेफ 17 धावांवर स्वस्तात बाद झाला.त्याच्यानंतर बेन मेयेस मैदानात आला.त्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो अवघ्या 45 धावांची खेळी करून बाद झाला. त्याच्यानंतर थॉमस रीव्यू मैदानात आला, पण तो देखील 31 वर बाद झाला.

एकीकडे एकामागून एक विकेट पडत असताना तिकडे वेन डावकिन्सने एकट्याने इंग्लंडचा डाव सावरला होता. बेन 66 धावांवर खेळत होता आणि तो शतक ठोकेल असे वाटत होते. पण तो देखील बाद झाला. तो बाद झाल्यानंतर विकेटची रांगच लागली होती. पण नंतर सेलेब फॉल्कनरने इंग्लंडचा डाव सावरत अर्धशतकीय खेळी केली होती.त्याच्यानंतर त्याने पुढे धावा करत शतक ठोकले होते. त्यानंतर तो 115 धावांवर आऊट झाला आणि इथेच संपूर्ण मॅच फिरली आणि भारताने इंग्लंडला 311 धावांवर ऑल आऊट करत हा सामना 100 धावांनी जिंकला आहे. तसेच या विजयासह भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.

टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये 411 धावा ठोकल्या होत्या. वैभव सूर्यवंशीने 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते.यासोबत आयुश म्हात्रेची 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या दोघांसह शेवटच्या क्षणी कनिश्क चौहाने 20 बॉलमध्ये 70 धावांची ताबडतोब खेळी करून भारताला 411 धावांपर्यंत पोहोचवले होते.

दरम्यान इंग्लंडकडून जेम्स मिंटोने सर्वाधिक 3 तर सेबस्टीअन मॉरगन आणि ॲलेक्स ग्रीनने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या.त्यासोबत मॅना लम्सडेनने एक विकेट काढली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket