भाजपच्या पहिल्या यादीत सातारा जिल्यातील शिवेंद्रराजे भोसले , जयकुमार गोरे, अतुल भोसले यांचा समावेश.
सातारा (अली मुजावर )राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावेसह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश या यादीत आहे
भाजपच्या वतीने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिण या तीन जागांवरील भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. परंतु, कऱ्हाड उत्तरची उमेदवारी कोणाकडे याचा सस्पेन्स वाढला आहे.
निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसची यादी आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे तर कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
