Home » राज्य » प्रशासकीय » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “वृंदावन पोलीस टाऊनशिप”चे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “वृंदावन पोलीस टाऊनशिप”चे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “वृंदावन पोलीस टाऊनशिप”चे उद्घाटन

सातारा प्रतिनिधी :पोलीस मुख्यालय, सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी ब्रिटिशकालीन सुमारे १०० वर्षांपूर्वीची कौलारू, बैठ्या चाळीच्या स्वरूपातील जुनी व राहण्यास अयोग्य निवासस्थाने होती. ही घरे संख्येने अपुरी व मोडकळीस आलेली असल्याने ती पाडून त्या जागी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त नवीन निवासस्थाने उभारण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मा. व्यवस्थापकीय संचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदर जागेवर एकूण ६९८ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस अंमलदारांसाठी ६७२, पोलीस अधिकाऱ्यांसाठी २४ निवासस्थाने, पोलीस उपअधीक्षकांसाठी २ बंगलो, १ मल्टीपर्पज हॉल, व्यायामशाळा व वाचनालय यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे बांधकाम मेसर्स हर्ष कन्स्ट्रक्शन, नाशिक यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

हा भव्य गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत आहे. सातारा जिल्हा पोलीस दलासाठी उभारण्यात आलेल्या या संकुलास “वृंदावन पोलीस टाऊनशिप” असे नाव देण्यात आले आहे. येथील निवासस्थाने पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व सफाई कामगार यांना वाटप करण्यात आलेली आहेत.

या टाऊनशिपमध्ये २ मेगावॅटचे सबस्टेशन, २ एसटीपी (सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प), घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारण्यात आले आहे. तसेच स्वच्छता, साफसफाई व बागेच्या देखभालीसाठी BVG या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

या अत्याधुनिक व सर्व सोयींनी सुसज्ज अशा “वृंदावन पोलीस टाऊनशिप”मुळे पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून, स्वच्छ व सुरक्षित वातावरणात उच्च दर्जाच्या सुखसुविधांचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान 

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक

Live Cricket