Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरच्या अद्यावत दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वरच्या अद्यावत दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वरच्या अद्यावत दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

नगरपालिकेच्या पुढाकारातून न्यायालयाचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी

महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन अद्यावत इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या नवीन वास्तूमुळे महाबळेश्वरमधील न्यायालयाचा अनेक वर्षांचा जागेचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटला आहे.

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

महाबळेश्वरमध्ये न्यायालयाची स्वतंत्र सोय व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. २०१० मध्ये येथे कोर्टाची निर्मिती झाली असली, तरी न्यायालयासाठी हक्काची आणि सर्व सोयींनी युक्त अशी स्वतंत्र इमारत उपलब्ध नव्हती. ही गरज ओळखून महाबळेश्वर नगरपालिकेने पुढाकार घेतला. पालिकेच्या मालकीची असलेली आणि पोलीस ग्राऊंड शेजारी असलेली इमारत न्यायालयासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या जुन्या इमारतीचे पूर्णपणे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, आता एका अद्यावत आणि प्रशस्त वास्तूत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, वकील संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्याधिकारी योगेश पाटील, गटनेते अॅड. संजय जंगम, नगरसेवक अफजल भाई सुतार, आबा शिंदे, रोहित ढेबे, रवींद्र कुंभारदरे, संतोष अखाडे, राजू नालबंद, किसन शेठ शिंदे, मिलिंद ढेबे, अॅड. विजयकुमार दस्तुरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, युसूफ भाई शेख, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, शरद बावळेकर, शंकर ढेबे उपस्थित होते.

तसेच नगरसेविका विमल पारठे, संगिता वाडकर, विद्या बावळेकर, स्मिता पाटील, रेश्मा ढेबे यांच्यासह नगरपालिका अधिकारी अमित माने, मुरलीधर धायगुडे, माजी मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, राजुभाई मुलाणी व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

“२०१० मध्ये कोर्टाची निर्मिती झाली, परंतु न्यायालयाला स्वतःची सुयोग्य इमारत नव्हती. नगरपालिकेने पोलीस ग्राउंड शेजारील इमारत न्यायालयाकरिता देण्याचा निर्णय घेतला आणि सातत्याने पाठपुरावा करून आज या अद्यावत इमारतीचे लोकार्पण होत आहे. महाबळेश्वरवासीयांच्या न्यायालयाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला याचा आम्हाला सार्थ आनंद आहे.”अॅड. संजय जंगम (गटनेते, महाबळेश्वर नगरपालिका

या नवीन इमारतीमुळे वकील वर्ग आणि पक्षकार यांची मोठी सोय होणार असून, महाबळेश्वरच्या वैभवात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket