Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » साताऱ्यात पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन दीपलक्ष्मी सभागृहात २७ सप्टेंबरपर्यंत सुरु

साताऱ्यात पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन दीपलक्ष्मी सभागृहात २७ सप्टेंबरपर्यंत सुरु 

साताऱ्यात पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन दीपलक्ष्मी सभागृहात २७ सप्टेंबरपर्यंत सुरु 

सातारा :दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था,सातारा आणि पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन पुस्तकप्रेमी श्रीराम नानल आणि ज्येष्ठ पत्रकार-लेखक मुकुंद फडके यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रा रमणलाल शहा,प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे ,डॉ संदीप श्रोत्री,ऍड बाळासाहेब बाबर,व्यंकट मोरे,शिरीष चिटणीस व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शिरीश चिटणीस यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला 

श्रीराम नानल म्हणाले,हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे वाचक पुस्तकांकडे वळणार आहे शिरीष चिटणीस यांनी अशाच प्रकारे चित्रपटाशी निगडित एखादा उपक्रम राबवावा 

मुकुंद फडके म्हणाले,वाचक पुस्तकांपर्यंत येत नसतील तर पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे त्यासाठी असे अनेक उपक्रम महत्वाचे ठरतील  

डॉ संदीप श्रोत्री म्हणाले,अशा पुस्तक प्रदर्शनात लेखकांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला जावा त्यामुळे लेखन प्रक्रिया आणि त्यामागील उद्देश वाचकांना समजू शकेल 

प्रा रमणलाल शहा म्हणाले,पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण हे नेते त्यांच्या वाचनप्रेमामुळे मोठे झाले हे सर्वानी लक्षात ठेवावे 

यावेळी ऍड बाळासाहेब बाबर,व्यंकट मोरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले 

या पुस्तक प्रदर्शनात मान्यवर प्रकाशन संस्थेची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून या प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन पुणे, उत्कर्ष प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरबंध प्रकाशन,अमित प्रकाशन, साहित्यअक्षर प्रकाशन, समकालीन प्रकाशन व इतर प्रकाशकांच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके 25 ते 40 टक्के सवलतीत सातारकर वाचक ,ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ,अशी प्रदर्शनाची वेळ आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी या पुस्तक प्रदर्शनास संपर्क साधून 40% पर्यंत सवलत मिळून पुस्तके खरेदी करावे तसेच सातारच्या समस्त पुस्तक प्रेमी, ग्रंथप्रेमी,वाचकांनी पुस्तक प्रकाशनाच्या व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket