नारीशक्ती प्रभाग संघ संचालित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न
समुहातील महिलांना मिळणार विविध प्रकारची प्रशिक्षण
कराड दि.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद सातारा ,पंचायत समिती कराड संलग्न नारीशक्ती प्रभाग संघ,कार्वे ता.कराड अंतर्गत समुदाय स्तरीय प्रशिक्षण केंद्र उद्घघाटन कार्यक्रम विविध मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे शुभहस्ते व गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा अभीयान व्यवस्थापक अंकुश मोटे यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले.यावेळी शिक्षण मंडळ कराड चे सचिव चंद्रशेखर देशपांडे,जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोजकुमार राजे,संजय निकम, खंडाळा,वाई,खटाव तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण खुडे,पूनम गायकवाड, ऋषीकेश जाधव, नारीशक्ती प्रभाग अध्यक्ष वैशाली थोरात, दिपाली जाधव,स्वाती भोसले यांचेसह उमेद कराड टिमचे सर्व सदस्य उपस्थित होते.मान्यवरांचे उपस्थित समुहांना कर्ज मंजुरी पत्राचे वितरण व सेंद्रिय शेती करणाऱ्या महिलांना प्रमाणीकरण प्रमाणपत्र देण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले उमेद अभीयानाचे माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांमधून महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होत असून महिलांनी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादीत मालाला मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच उत्पादनाचे चांगले पॅकेजींग व लेबलींग केल्यास योग्य किंमत ही मिळेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केवळ एका महिन्याचे कालावधीत अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याबद्दल जिल्हा टिम व नारीशक्ती प्रभाग संघाचे कौतुक केले.उमेद च्या महिला करीता जिल्हा परिषद राबवत असलेले उपक्रमांची माहिती दिली.जिल्हयात गेल्या वर्षभरात 48 हजार लखपती दिदी आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे.महिलांना विक्रीसाठी खात्रीशीर बाजारपेठ मिळावी या हेतूने पाचगणी येथे मॉल उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी कराड उमेद विभागाचे माध्यमातून कराड जत्रा,बांबू महोत्सवाचे यशस्वी आयोजन बरोबर चालू वर्षात समुहांना २०कोटिंचे बँक कर्ज अर्थसहाय्य व्यवसायासाठी देण्यात आलेची माहिती दिली.शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रशिक्षण केंद्राद्वारे उमेदअंतर्गत कार्यरत संसाधन व्यक्ती, विविध शासकीय विभागांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहेत. या प्रशिक्षण केंद्र मधून विविध विषयांचे प्रात्यक्षिक व क्षेत्रभेटीतून महिलांना आत्मनिर्भर करणे तसेच समुदाय संचलित संस्थेला अर्थार्जण व्हावे व त्यासोबतच ग्रामीण गरीब कुटुंबातील महिलांना सर्व सोयींनी युक्त प्रशिक्षण केंद्र उपलब्ध व्हावे व याच्या माध्यमातून सर्वांची क्षमता बांधणी व्हावी हा सुद्धा एक उद्देश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली थोरात यांनी केले.सुत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले तर आभार स्वाती भोसले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, प्रभाग समन्वयक चिन्मय वराडकर व उमेद तालुका टीम यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्वे प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.