Home » राज्य » प्रशासकीय » मेट्रो भवनाचे उदघाटन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र

मेट्रो भवनाचे उदघाटन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र

मेट्रो भवनाचे उदघाटन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

पुणे मेट्रोच्या कामाची गती ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो कामांपैकी एक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मेट्रो टीमचे कौतुक केले. मेट्रो भवन हे केवळ एक कार्यालय नसून, मेट्रोच्या स्वयंचलित सिग्नलिंग, कमांड अँड कंट्रोल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हृदय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी अशा प्रकारच्या सुसज्ज इमारतीची नितांत गरज होती, जी आज पूर्ण झाली आहे.

पुणेकरांनी मेट्रोचा उदंड प्रतिसाद दिला असून, दैनंदिन प्रवाशांची संख्या 2.5 लाखांच्या पार गेली आहे. विशेषतः गणेशोत्सवात एकाच दिवशी पावणे सहा लाख प्रवाशांनी प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला. हा ओघ पाहता, मुख्यमंत्री यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केले. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचे पूर्णपणे एकत्रीकरण (Integration) केले जाणार आहे. मेट्रोच्या कामाची गती 5 वर्षांवरून 3 वर्षांवर आणण्याचे जागतिक निकष गाठण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे शहर आता ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) चे केंद्र बनत आहे. महाराष्ट्र हे जीसीसी धोरण आखणारे देशातील पहिले राज्य ठरले असून, पुण्याने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. 

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket