Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गिरिजा हॉस्पिटल : आर्थोपेडिक आणि त्वचारोग विभागाचा शुभारंभ

गिरिजा हॉस्पिटल : आर्थोपेडिक आणि त्वचारोग विभागाचा शुभारंभ

गिरिजा हॉस्पिटल : आर्थोपेडिक आणि त्वचारोग विभागाचा शुभारंभ

सातारा : येथील गिरिजा न्युरोसर्जरी हॉस्पिटलला २७ वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आहे. न्युरोसर्जन डॉ. सुनील यादव यांनी १५ ऑगस्ट १९९८ रोजी स्वातंत्र्यदिनी, गिरिजा हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी साताऱ्यात फारशा वैद्यकीय सोयी-सुविधा नव्हत्या. मोठ्या धाडसाने डॉ. सुनील यादव यांनी गिरिजा हॉस्पिटलची स्थापना करुन उत्तमरित्या चालवले. त्यांचा मुलगा डॉ. रोहित यादव हा एस. एस. आर्थों असून त्यांच्या अस्थिरोग विभागाचा शुभारंभ आज होत आहे. त्यानिमित्ताने…..

डॉ. सुनील यादव यांचा जन्म साताऱ्याचा. आपल्या जन्मगावीच ग्रामीण रुग्णांना सुपर स्पेशालिटी न्युरोसर्जरीची सेवा देण्याचे डॉ. यादव यांनी ठरवले होते. त्यावेळी आयसीयू, सीटी स्कॅन या सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. पुणे-मुंबईच्या तोडीची सुपर स्पेशालिटीची सेवा आणि माफक दरात देऊन अल्पावधीतच गिरिजा हॉस्पिटलची ख्याती जिल्ह्यात सर्वदूर पसरली. रुग्णसेवेचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच रोहित यांना मिळाले होते. आपल्या वडिलांची रुग्णसेवेची तळमळ पाहून आपणही डॉक्टर बनून रुग्णसेवा करण्याचे मनोमन ठरविले. मोठ्या जिद्दीने पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. रोहित यादव यांनी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथून एमबीबीएस केले. तदनंतर एम. एस. (आर्थो) चे शिक्षण श्री बालाजी मेडिकल कॉलेज, चेन्नई येथे पार पडले. अस्थिरोग विभागातील स्पेशॅलिटी ट्रेनिंग त्यांनी मुंबई येथील प्रख्यात सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. निलेन शाह तसेच सोलापूर येथील कॉम्लेक्स ट्रॉमा डॉ. मन्मथ राऊत आणि डॉ. सुदर्शन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. दुर्बिणीतून सांधेतपासणी याचे शिक्षण पुणे आणि भारतातील विविध हॉस्पिटल मध्ये घेतले.

गिरिजा हॉस्पिटल मधील सुरु होत असलेला अस्थिरोग विभाग आणि त्याच्या संबंधित असलेल्या सांधेरोपण, दुर्बिणीतील शस्त्रक्रिया, अवघड फ्रैक्चर्स यांचे उपचार मापक दरात उपलब्ध करुन देण्याचा डॉ. रोहित यादव यांचा मानस आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अश्विनी यादव या ही लवकरच त्वचारोग आणि कॉस्मेटॉलॉजी सुरु करणार आहेत. नव्या पिढीचे आणि ताज्या दमाचे डॉ. रोहित यादव यांनी गिरिजा हॉस्पिटलची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. माया, ममता, किफायतशीर दराची परंपरा यापुढेही डॉ. रोहित सुरु ठेवतील. त्यांच्याकडून रुग्णांवर अत्याधुनिक उपचार होऊन रुग्णसेवा वृद्धिंगत होवो, यासाठी हार्दिक शुभेच्छा !

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 70 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket