क्विक हिल फाउंडेशनच्या “सायबर वॉरियर्स क्लब उद्घाटन कार्यक्रमास” यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा महाविद्यालयातील क्लब ऑफिसर्स व सायबर वॉरियर्स प्रतिनिधी यांची उपस्थिती.
दिनांक २४/०७/२०२४ रोजी डॉ. डी. वाय. पाटील अग्रीकल्चर अँड टेक्निकल युनि्हर्सिटी, तलसंदे कोल्हापूर येथे क्विक हिल फाउंडेशनच्या ” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा २०२४-२५ ” या अभियानासाठी निवड करण्यात आलेल्या महाविद्यालयांचे क्लब ऑफिसर्स,विद्यार्थि प्रतिनिधी, प्राचार्य व शिक्षक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सायबर वॉरीअर्सच्या क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व क्लब ऑफिसर्स, विद्यार्थि प्रतिनिधींचा सत्कार मा. अनुपमा काटकर चेअरपर्सन- क्विक हिल फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आला,यामध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील किरण सानप (क्लब प्रेसिडेंट), सत्यजित जगताप ( क्लब सेक्रेटरी), गणेश राणे (कम्युनिटी डायरेक्टर), अनिकेत शिर्के (पी. आर. मेडिया डायरेक्टर) व निवड झालेल्या इतर २६ विद्यार्थी प्रतीनीधींचा सायबर वॉरियर्स बॅच देऊन सत्कार केला आहे. प्रसंगी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील सायबर सुरक्षा प्रोग्रामचे समन्वयक प्रा विकास चव्हlण यांना क्विक हिल फाउंडेशनच्या प्रकल्पतील सहभागाबद्दल अधिकृतता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ते प्रमाणपत्र यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा याद्वारे प्रत्येकासाठी सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी सायबर सुरक्षा जागरूकता, शिक्षण आणि अपस्किल सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्विक हील सायबर वॉरियर क्लबची स्थापना आणि संचालन करण्यासाठी अधिकृत आहे.
दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. अजय शिर्के सह. संचालक क्विक हिल फाउंडेशन देश सेवा यांचा विचार मनात तेवत ठेवत स्वतःमधील बदलाने सुरूवात करत समाज व्यापी काम आपल्या सर्वांना एकत्रित मिळून करायचे असल्याचे सांगितले, तसेच आज आपण डिजिटल युगात आहोत असे म्हटले जाते.आपण पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत.त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढत आहे.आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यांवर अवलंबून आहेत.विविध बँका, आरोग्य सेवा, वित्तीय संस्था,कंपन्या या इंटरनेटशी कनेक्ट असलेली उपकरणे वापरतात. त्यांची काही गोपनीय माहिती, आर्थिक डेटा आणि वैयक्तिक डेटा, संवेदनशील असू शकतात.जी माहिती बाहेर पडल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे चांगली सायबर सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे.आपल्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. गायत्री केसकर एक्झीक्युटिव्ह सी.एस.आर. यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले व विद्यार्थ्यांना अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रमासाठी प्रा विकास चव्हाण आणि प्रा दीपा राठोड आदि उपस्थित होते.या अभियानासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, डायरेक्टर डॉ विवेक रेदासानी, असोसिएट डायरेक्टर प्रा आर डी मोहिते, रजिस्ट्रार मा. गणेश सूरवसे, संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ सरिता बलशेट्वर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.