Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी घेतली सातारा जिल्हा प्रशासनाची बैठक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी घेतली सातारा जिल्हा प्रशासनाची बैठक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी घेतली सातारा जिल्हा प्रशासनाची बैठक

प्रशासकीय यंत्रणांनी २४X७ सतर्क राहण्याबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दिले निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा : गुरुवार, २५ जुलै २०२४

आज सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची कोणत्याही स्थितीत गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. तसेच दरडप्रवण क्षेत्रात, भूस्खलनबाधीत क्षेत्रात, डोंगरी व दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांचे आवश्यकता वाटल्यास त्वरित सुरक्षित स्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित केलेल्या ठिकाणी अन्न, पिण्याचे पाणी व अनुषंगिक प्राथमिक सुविधांचे नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी २४x७ सतर्क राहावे. कोणत्याही स्थितीत नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले.

तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी करावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशा ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिले. तसेच ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवावा. दिवसा तसेच विशेषत: रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची कार्यस्थळावर उपस्थिती बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणी आवश्यक कार्यवाही करून वाहतूक सुरुळीत करण्यात यावी. ज्या ठिकाणी रस्ते, पुल पाण्याखाली जातात त्या ठिकाणी लोकांना जाण्यास प्रतिबंध करावा. विद्युतपुरवठा खंडीत झाल्यास त्वरित सुरळीत करण्यात यावा. क्षेत्रीय स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी धोकादायक गावांना भेटी द्याव्यात. तसेच पोलीस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल यांनी मुख्यालय ठिकाणी राहण्याबाबत सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिल्या.

सातारा जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या असून ज्या भागात पावसाने नुकसान झाले आहे, त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करावे. मोठ्या पावसामुळे ओढ्यांचे प्रवाह शेतात जाऊन पिकांचे नुकसान होते. अशा नुकसानीचेही पंचनामे तात्काळ करावेत. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकता भासल्यास शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी, असे निर्देशही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, साताऱ्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी दृरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket