Post Views: 216
कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू
कराड शहरानजीक मलकापुरात प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे बुधवारी समोर आली आहे. आरोशी मिश्रा (वय २१) असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू तर झालेल्या झटापटीत प्रियकराचा मोडला आहे.अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसानी दिली.
