सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान – श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान – श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान – श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

सातारा -सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत. सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाहीच तथापि राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श वैदयकिय महाविदयालय म्हणून छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालय लवकरच नावारुपाला आणण्याचे संर्वकष प्रयत्न केले जातील अशी माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडिया द्वारे दिली.

सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी अनेकांचे योगदान मिळाले असले तरी वैदयकिय महाविदयालय होण्यासाठी सर्वप्रथम 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी स्व.क्रांतिवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले, त्यानंतर लागणा-या विस्तीर्ण जागेचा प्रश्न राज्यशासनाशी चर्चा करुन, सोडवण्यात आल्यावर आता कृष्णानगर येथील विस्तीर्ण जागेवर वैदयकिय महाविदयालयाची उभारणी सुरु आहे. या वैदयकिय महाविदयालयात 100 विदयार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरु करुन, आज महाविदयालयाचे 4 थे वर्ष सुरु आहे. येत्या दोन वर्षात याठिकाणी पोस्टग्रॅज्युएशनची सुविधासुध्दा निर्माण होणार आहे. दरम्यानच्या काळात या महाविदयालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आला. या वैदयकिय महाविदयालयामुळे सातारच्या अर्थकारणाला बळ मिळण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचे नावामुळे सर्वाना नवीन प्रेरणा देखील सातत्याने मिळणार आहे.

वैदयकिय महाविदयालयाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण होत आलेले आहे. राज्यशासनही अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देत आहे. तथापि वैदयकिय महाविदयालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडूनही जरुर तो पाठपुरावा करुन आज रोजी 100 कोटी रुपये प्राप्त करुन घेण्यात आले असून, सदरची रक्कम महाविदयालयाकडे कालच जमा झाली आहे. केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.या सहाय्य निधी मधुन महाविदयालयाची इमारत, निवास वसतीगृह, इत्यादी कामांसाठी उपयोगात येणार आहेत, आणखी दुस-या टप्यातील भरीव निधी देखिल येत्या सहा महिन्यामध्ये मिळवण्यात येणार आहे .वैदयकिय महाविदयालयाचे उभारणीचे कामात असाधारण विलंब होवू नये म्हणून आमचे सातत्याने लक्ष आहे. वैदयकिय महाविदयालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket