तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » प्रशासकीय » येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील

येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील

येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील

कराड, प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून याबाबत कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता एकजुटीने कामाला लागावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनतेच्या सहकार्याने विजय मिळवेल, असा विश्वास कराड दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केला. दिवाळी निमित्त आयोजित फराळ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, युवानेते इंद्रजीत चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, गजानन आवळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासो जाधव, सातारा जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, कराडचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, शिवाजी जमाले, रवि बडेकर, सुरेश भोसले, प्रदीप शिर्के आदीसह काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले की, काँग्रेस हा जुना व अनुभवी पक्ष असून आपल्याला या मतदार संघात काँग्रेसचे अनुभवी नेते लाभले आहेत यामुळे आजपर्यंत कराड दक्षिणचा योजनापूर्ण असा विकास होत गेला आहे. कराडला पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आणि त्या काळात व नंतरच्या आमदारकीच्या कार्यकाळात पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणमध्ये करोडो रुपयांची विकासकामे आणली व कराडचा चेहरा-मोहराच बदलला. अजूनही अनेक विकास कामांची भूमिपूजन व उदघाट्न सुरु आहेत. 

यावेळी इंद्रजीत चव्हाण, ऍड. अमित जाधव, अजितराव पाटील, वैशाली जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव दिग्विजय सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket