Home » देश » जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील विलक्षण आणि अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील विलक्षण आणि अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील विलक्षण आणि अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील विलक्षण आणि अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सुतार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं नोयडा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल श्री. सुतार यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि २५ लाखांचा धनादेश असं स्वरूप असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचा हा सन्मान हा राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आदर, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहास, कला आणि सांस्कृतिक वैभवाला अधोरेखित करणारा हा सन्मान राम सुतार यांच्या कार्याचा अभिमानपूर्वक गौरव करतो. त्यांच्या अद्वितीय कलाकृतींसाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

श्री. राम सुतार यांनी देश–विदेशातील शेकडो भव्य शिल्पांद्वारे भारतीय इतिहास, संस्कृती आणि चिंतनपरंपरा प्रभावीपणे साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या महामानवांची त्यांनी साकारलेली स्मारकशिल्पे ही त्यांच्या असामान्य कलाकौशल्याचं आणि त्या विभूतींबद्दलच्या आदराचं द्योतक आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच दादर येथील चैत्यभूमीवर उभारण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ही त्यांच्या कलेची भव्य उदाहरणं आहेत. त्यांच्या या अद्वितीय शिल्पनिर्मितीद्वारे त्यांनी भारतीय इतिहास, मूल्ये आणि महामानवांचे विचार जागतिक स्तरावर जिवंत ठेवण्याचं मोलाचं कार्य केलं आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान 

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक

Live Cricket