Home » राज्य » शिक्षण » जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते – अँड चंद्रकांत कदम

जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते – अँड चंद्रकांत कदम

जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते – अँड चंद्रकांत कदम

तांबवे– जीवनात जिद्द, चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते.स्वर्गीय ए. व्ही.पाटील यांनी केलेल्या सामाजिक कामाचे पोहच पावती म्हणून च अविनाश पाटील हे पोलिस निरीक्षक झाले .चांगले विचार असले की पुढील पिढी ही चांगली घडते.असे प्रतिपादन अँड चंद्रकांत कदम यांनी केले . सदाशिवगड ता. कराड येथील माध्यमिक विद्यालयात यशवंत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी अविनाश पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली म्हणून आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी संस्था सचिव डी. ए. पाटील, गावचे उपसरपंच शरद कदम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शकुंतला पाटील, पोलिस निरीक्षक अविनाश पाटील,संस्था संचालक राजेंद्र काटवटे, ग्रामपंचायत सदस्य पितांबर गुरव,प्रकाश पवार, अतुल पवार, संदीप कदम, रामचंद्र वंजारी,कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, शामराव देशमुख सर, शशिकांत सांळुखे, सोमनाथ नरेवाडीकर, सेवावृत्ती पोलिस निरीक्षक उदय डुबल, संभाजी चव्हाण , भिमराव जगताप, मुख्याध्यापक ए.आर .मोरे,के. आर .साठे,डी. पी. पवार,व्ही. एच. कदम, एम .बी. पानवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्था सचिव डी ए पाटील म्हणाले आमचे यशवंत शिक्षण संस्था मध्ये नेहमीच विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी सहशालेय उपक्रम राबविले जातात.याचे फलित म्हणून च संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर कार्यरत आहेत.अविनाश पाटील यांनी ही कष्ट मेहनत घेतली म्हणून त्यांना पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली.जिथे जाईल त्या ठिकाणी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. सत्कार मुर्ती अविनाश पाटील म्हणाले की सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे.यामध्ये आपले अंगी कठोर परिश्रम, कष्ट, अभ्यास करण्याची गरज आहे.माझे मायभूमीत झालेला सत्कार हा मला बळ देणारा आहे.स्वर्गीय आण्णांनी दिलेलं संस्कार व विचार व कष्ट करण्याची ताकदीने च मी आज पोलिस निरीक्षक पदावर पोहचलो आहे.नेहमीच मी गाव,भागाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी झटत नाहीत. यावेळी शरद कदम,दिपक पवार, सुधाकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका मनिषा पानवळ सुत्रसंचलन सुरेश वेताळ व आभार आर एम अपिने यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket