वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात १ लाख ७ हजार महिलांना लाडक्या बहीण योजनेचे प्रत्येकी ७५०० रुपयांचे वाटप-आ.मकरंद पाटील
सातारा :लाडकी बहीण योजनेसाठी आमच्या सरकारने तब्बल ४४ हजार करोड रुपयांची तरतूद केलेली असून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील १ लाख ७५ हजार महीलांपैकी १ लाख ७ हजार महिलांना प्रत्येकी ७५०० रुपये मिळालेले आहेत.आमच्या सरकारने आता प्रत्त्येक घरातील सदस्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे असे प्रतिपादन आ.मकरंद पाटील यांनी केले.
या प्रसंगी यशवंत नगर चे उपसरपंच शामराव गाडे,ग्रा. सदस्या कोमल लाखे,भटक्या विमुक्त समाजाचे अध्यक्ष शंकर जावळे, माजी उप सरपंच विजय जावळे,युवा संघटनेचे अध्यक्ष राहुल गाडे,सदस्य लाकेश लाखे, समाज सेविका मीराबाई कुडाळकर,सामाजिक कार्यकर्ते पवण लाखे,उदय लाखे,बंडू औंध,हरी कुडाळकर,जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव भोसले,मारुती लाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले की मी ज्या ज्या वेळी निवडणुकीला उभा राहिलो त्या प्रत्येक वेळी इथे येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.प्रत्त्येक वेळी लखानगर मधील सर्वांनीच मला प्रचंड मताधिक्य दिलं.म्हणूनच मी मागील वेळी लाखानगर मधीलच शामराव गाडे यांनी उपसरपंच केलं.यशवंत नगरला साडे सोळा कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली आहे.त्यामुळे लाखा नगरची पाण्याची समस्या कायम स्वरूपीं निकाली निघणार आहे.पाणी,लाईट रस्ते या सर्व सुविधा मी देण्याचा प्रयत्न केला आहे.आपलं नात घरगुती आहे.मी इथे आलो की मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतं.भारतीय जनता पार्टीचे मीरा ताई आणि पवन लाखे यांनी मला पाठिंबा दिला आहे.त्यांची मदत मी कधीच विसरणार नाही.येणाऱ्या २० तारखेला लखानागर चे १०० टक्के मतदान मला मिळेल याची खात्री आहे.येवढ्या मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी इथे आल्या आहेत.या सर्व भगिनींना पाहून मला खूप आनंद झालाय.वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये १ लाख ७५ महिलांपैकी १ लाख ७ हजार महिलांना आत्ता पर्यंत लाडक्या बहीण योजनेचे प्रत्येकी ७५०० रुपये आलेले आहेत.या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने तब्बल ४४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.सरकार तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे.बेरोजगार मुलांना ८००० ते १२००० रुपये देण्याचा निर्णय झालाय.हे पैसे सरकार एक वर्ष देणार आहे.
या प्रसंगी लाखानगर मधील नागरिक,महिला,युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
आमदार मकरंद पाटील यांच्या लाखानगर येथील सभेसाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.उपस्थित सर्वच महिला आणि युवतींनी आमदार मकरंद पाटील यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.या प्रसंगी या महिलांनी ” आबा,तुम्हीच आमचे तारणहार आहात.आम्ही तुम्हालाच १०० टक्के मतदान करणार आहोत.एक मत ही वाया जाऊ देणार नाही असे अभिवचन या महिला युवतींनी आमदार मकरंद पाटील यांना दिले.