महत्त्वाची सूचना : कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा
सातारा -सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे उद्या शुक्रवार दि. २० मार्च रोजी सकाळी ९:०० वा नदी विमोचकामधून १५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.कोयना नदीमध्ये एकूण ३६०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.




