ग्रामीण भागात अद्ययावत तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे-प्रकाश पवार
भुईंज : तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ दिले आहे, असे प्रतिपादन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार यांनी पाचवड, ता. वाई येथे केले.परराष्ट्र सेवेतील अधिकारी कै.राजेश स्वामी यांनी आपल्या कर्तृत्वामुळे सातारा जिल्ह्याचें नाव मोठे केले आहें.
वाई येथील राजू पवार यांनी या अभ्यासिकेला मौल्यवान ग्रंथ संपदा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. राजू पवार यांनी, ग्रामीण भागात देखील अशा प्रकारची सर्व सोयींनी परिपूर्ण अभ्यासिका असल्याने त्याचा लाभ युवकांना, विद्यार्थ्यांना होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका शिल्पा पवार यांनी, या अभ्यासिकेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता यावा याकरता विद्यार्थ्यांच्या मागणीवरून वेळ वाढवल्याचे सांगितले.
यावेळी प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, उत्कर्षचे वसुली अधिकारी आनंद पवार, सीमा सुरक्षा दलाचे जवान अक्षय पवार उपस्थित होते. तिरंगा संस्थेच्या वतीने राजू पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.