Home » ठळक बातम्या » मतदारसंघातील जनतेसाठी मी कायम ‘रिचेबल’ आ.शिवेंद्रराजे

मतदारसंघातील जनतेसाठी मी कायम ‘रिचेबल’ आ.शिवेंद्रराजे

मतदारसंघातील जनतेसाठी मी कायम ‘रिचेबल’ आ. शिवेंद्रराजे

लोकांच्या प्रेमामुळे मला विक्रमी मताधिक्य मिळेल 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )काही लोक निवडणूक आली कि उगवतात. माझं तसं नाही. मी कायम मतदारसंघात असतो. मी साताऱ्यात राहतो. मी दररोज लोकांना भेटतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवतो. अचानक उगवलेला विरोधी उमेदवार निकालानंतर पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, काहीही झालं तरी मतदारसंघातील जनतेसाठी मी २४ तास ‘रिचेबल’ आहे आणि कायम राहीन. लोकांच्या प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्यावर मला विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

             सातारा- जावली विधानसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी छ. शाहू चौक, कुंभारवाडा, पाटोळे चौक, शंभूराज देसाई बंगला, पोवई नाका, कासट मार्केट, शिकलगार वाडा, तहसील कचेरी, भाजीमंडई, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, वडार वस्ती, पंताचा गोट मैदान, प्रकाश लॉज, प्रिया व्हरायटीज ते शिक्षक बँक अशी पदयात्रा अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. . 

          आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अधिवेशन काळात मी मुंबई अथवा नागपुरला असतो. पुन्हा शनिवार रविवारी साताऱ्यातच असतो. मी पाचही वर्ष मतदारसंघात असतो. माझ्या कार्यालयात दररोज मी लोकांना भेटतो त्यांचे प्रश्न सोडवतो. मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भाने चर्चा होते आणि ती कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करतो. आजवर हजारो विकास कामे मार्गी लावली आहेत. सातारा शहरात मेडिकल कॉलेज, हद्दवाढ झाली, कास धरणाची उंची वाढवली. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. काही दिवसात नवीन जलवाहिन्यातून कासचे पाणी नागरिकांना मिळणार आहे. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आताही महायुतीचेच सरकार येणार असून आगामी काळात सातारा शहरासह सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू, असे ते म्हणाले. 

             रविवार दि. १० रोजी सकाळी ७ वाजता सुरुची बंगला, कोटेश्वर चौक, जाधव आवाड, ऐक्य प्रेस, बुधवार नाका, लकडी पूल ते ५०१ पाटी अशी पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता भारतमाता चौक, सदरबझार आणि रात्री ८ वाजता रामभाऊ नलवडे, अप्पा महाडिक घर, चिपळूणकर बाग येथे कोपरा सभा होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 13 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket