Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक १४ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक १४ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक १४ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो.सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जर आपल्याला वारंवार छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारच्या गोष्टींची तक्रार आहे त्यांनी आपली तपासणी करुन घेणे जरुरीची आहे. यासाठी अॅन्जिओग्राफी करुन घेणे आवश्यक ठरते. अॅन्जिओग्राफीमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही दोष, अडथळा आहे का हे कळून येते. अॅन्जिओग्राफी किंवा आर्टिरिओग्राफी एक वैद्यकीय इमेजिंग तंत्र आहे. ज्याचा उपयोग रक्तवाहिन्या आणि शरीराच्या अवयवांच्या आतील किंवा लुमेनची कल्पना करण्यासाठी केला जातो. याकरिता हृदयविकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी पडते.

सातारा, रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस येथे गुरूवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ आणि मिशन हॉस्पिटल, वाई येथे १ ते ३ यावेळेत रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. तरी रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 292 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket