नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला पोलीस पाटील काढणार मोर्चा

हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला पोलीस पाटील काढणार मोर्चा

हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला पोलीस पाटील काढणार मोर्चा

कराड-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ तसेच विविध सहयोगी संघटनांच्यावतीने 10 डिसेंबरला पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. संघाच्या तालुकाध्यक्षांनी या मोर्चात जास्तीत जास्त पोलीस पाटील सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत. मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अमित शिंदे-पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, खान्देश अध्यक्ष प्रवीण गोसावी, राज्य सदस्य लीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगी संघटनांच्या सहयोगाने हा मोर्चा काढला जाणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपुर्वी सर्व विभागातील सचिवांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी मागण्या मांडताना बाळासाहेब शिंदे पाटील यांनी वयोमर्यादा साठवरून 65 करावी, या प्रमुख मागणीसह नुतणीकरण बंद करावे, सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटील यांना एकरकमी पैसे द्यावे, विमा कवच तसेच पोलीस पाटील अधिनियमात दुरुस्ती अशा अनेक मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावर उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी प्रस्ताव पाठविण्यासाठी सचिवांना सूचना दिल्या होत्या. त्यावर मंत्रिमंडळाने लवकरच निर्णय घ्यावा, यासाठी पोलीस पाटील यांची एकजूट हिवाळी अधिवेशनात दाखविणे गरजेचे आहे.

मंत्रिमंडळाला या मागण्यांबाबत निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सर्व पोलीस पाटील यांनी या मोर्चात सहभागी व्हावे. घरी बसून आपल्या पदरात काहीच पडणार नाही. एकजूट करून संघाचे नेते बाळासाहेब शिंदे-पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी ताकद उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित शिंदे-पाटील व सर्व जिल्हा पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket