अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » हिंदवी’ची एनसीईआरटीच्या प्रयास योजनेत निवड

हिंदवी’ची एनसीईआरटीच्या प्रयास योजनेत निवड 

हिंदवी’ची एनसीईआरटीच्या प्रयास योजनेत निवड 

सातारा, ता. १० ः शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), नवी दिल्ली यांच्या ‘प्रयास २०२५-२६’ या प्रतिष्ठित योजनेंतर्गत निवड झाली आहे. 

या योजनेंतर्गत संपूर्ण देशभरातून केवळ ३८ शाळांची निवड करण्यात आली असून, त्यात हिंदवी स्कूलचा समावेश झाला. नैसर्गिक रंगद्रव्यांनी समृद्ध तुतीची पाने रेशीम अळ्यांना खाऊ घालून नैसर्गिकरीत्या रंगीत रेशीम तयार करणे असे प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाचे शालेय मार्गदर्शन मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर यांनी केले असून, तांत्रिक मार्गदर्शन डॉ. सविता नलवडे (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव) यांनी केले आहे, तसेच उच्च शिक्षण संस्था म्हणून हिंदवी रिसर्च सेंटर, सातारा यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. 

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचा शाळेमध्ये नुकताच गौरव समारंभ झाला. यावेळी दातार शेंदूर स्कूलचे अध्यक्ष अनंतराव जोशी, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रामणी कुलकर्णी, हिंदवी रिसर्च सेंटरचे डॉ. विश्वास देशपांडे, डॉ. सविता नलवडे, डी. पी. भोसले कॉलेजचे प्राचार्य प्रा. एल. डी. कदम, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, हिंदवी रिसर्च सेंटरचे समन्वयक अभिजित पठारे, संदीप जाधव व शिक्षक उपस्थित होते. 

श्री. जोशी म्हणाले, ‘‘हा प्रकल्प केवळ प्रयोग नाही, तर टिकाऊ भविष्यासाठी एक उपयुक्त दिशा आहे.’’ श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात नवे पाऊल टाकत आहेत, ही केवळ शाळेचीच नव्हे, तर साताऱ्याची शान आहे.’’ डॉ. विश्वास देशपांडे म्हणाले, ‘‘या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन विकसित होईल. हिंदवी रिसर्च सेंटरचे ध्येय म्हणजे शालेयस्तरावर संशोधन संस्कृती रुजवणे असून, हा प्रकल्प त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’’ विभाग प्रमुख शिल्पिता मांगडे यांनी सूत्रसंचालन केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket