Home » ठळक बातम्या » Bollywood » हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. 

सलमान खान नावच पुरेसं आहे. सलमानचं नाव जिभेवर येताच मनात अनेक गोष्टींचा विचार सुरू होतो. सलमान हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी सुपरस्टारपैकी एक आहे. 27 डिसेंबर रोजी ‘दबंग’ खान आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे.

हिंदी सिनेसृष्टीत सलमान खानच चांगलच वर्चस्व आहे. सलमान ज्या व्यक्तीवर आपला हात ठेवतो, त्या व्यक्तीचं नशीब उजळतं, असं म्हटलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीचा दबंग सुपरस्टार सलमान खान आज, २७ डिसेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सलमान खानने आपल्या अभिनयाने, स्टाईलने आणि लोकप्रियतेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खानने नायक म्हणून पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर हम आपके हैं कौन, करण अर्जुन, तेरे नाम, बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर सिरीज, दबंग यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून त्याने आपली स्टारडम कायम राखली.

अभिनयासोबतच सलमान खान सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. त्याची ‘बीइंग ह्युमन’ ही संस्था गरजू लोकांसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करत आहे. तसेच बिग बॉस या लोकप्रिय रिऍलिटी शोमुळे तो घराघरात पोहोचला आहे.

६० व्या वाढदिवसानिमित्त सलमान खानला देश-विदेशातून चाहते, कलाकार आणि राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वयाची साठ गाठली असली तरी सलमान खानची ऊर्जा, चाहत्यांमधील क्रेझ आणि चित्रपटांवरील पकड आजही तितकीच मजबूत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर

Post Views: 9 शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये क्रीडा

Live Cricket