कृषी कन्यांकडून भुईमूग तेल गाळन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
कराड: मुंढे, ता .कराड ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक व कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, कराड येथील कृषीकन्या सृष्टी कदम,सानिका कांबळे, ऐश्वर्या कुचेकर, भारती माने, नेहा मोरे, यशस्वी नलवडे, पूजा पारसे या मुंढे गावात दाखल झाल्या आहेत.
आता पर्यंत कृषीकन्यांनी मधमाशी पालन, तेल गाळणे,फळबागाची शास्त्रीय लागवड, हुमणी, बीजप्रक्रिया, इ.प्रात्यक्षिके दाखवली. खाद्यतेला साठी जास्त प्रमाणात भुईमूग,सुर्यफुल ,खोबर,सरकी, तीळ, सोयाबीन अशा अनेक तेल बियांची वापर केला जातो. मुंढे गावा मध्ये मुख्य पिके उस, भुईमूग, सोयाबीन इ. असुन,मुंढे गावामध्ये भुईमूग तेलाचा सर्वसामान्य वापर जास्त दिसून आला हे स्वरूप पाहता कृषीकन्यांनी भुईमूग बीया चा वापर करून तेल गाळणे प्रात्यक्षिक दाखवल.
यामुळे गावातील महिलांना व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लघु उद्योग करण्यास प्रोत्साहन मिळाले.भुईमूग तेलाचे फायदे व तोटे , तेल भेसळ यांची महिती व त्याचे होणारे दुष्परिणाम तसेच त्याच्या अवशेषांचा योग्य वापर अशा बऱ्याच गोष्टींवर कृषीकन्यांनी भर दिला.भुईमग तेलामध्ये व्हिटॅमिन इ आणि मोनोअनसैच्यूरेटेड आणि पोलीअनसैच्युरेटेड फॅट्स असल्यामूळे हे वनस्पती तेलाचे आरोग्यदायी आणि परवडणारी आवृत्ती आहे. प्राचीन काळा पासूनच आपण बैलांच्या साहाय्याने तेल गाळणे ही कला अवगत होती .कलांतराने त्याचे रुपांतर यंत्रामध्ये झाले यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचण्यास मदत व आर्थिकदृष्ट्या मध्ये बदल घडू शकतो. या गोष्टोवर कृषीकन्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला व तेल गाळण्याच्या पद्धती सोबत त्याचे इतर फायदे कृषीकन्यांनी शेतकऱ्यापर्यंत पोहचवले.
श्री राजेंद्र दुर्गाप्रसाद गरगटे यांच्या साहाय्याने कृषीकन्यांनी तेल गाळणे प्रात्याक्षिक दाखवले.या उपक्रमासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. एस. व्ही. बुलबुले,केंद्रप्रमुख डॉ. आर. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. आर. हसुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. एस. ताठे, डॉ. सुनील अडांगळे,विषयतज्ज्ञ डॉ . उमराव बोंदार , डॉ. प्रियांका जगताप, डॉ. अर्चना मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.