नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शेत शिवार » हणबरवाडी उपसासिंचन योजनेस २०२ कोटी ७४ लाख निधी मंजूर

हणबरवाडी उपसासिंचन योजनेस २०२ कोटी ७४ लाख निधी मंजूर

हणबरवाडी उपसासिंचन योजनेस २०२ कोटी ७४ लाख निधी मंजूर

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश

कराड उत्तर मतदार संघातील बहूचर्चित हणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या टप्पा क्रमांक २ साठी सुप्रमा ३ शासनाकडे मंजूरी साठी होती. आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये हणबरवाडी धनगरवाडी उपसासिंचन योजने साठी २०२ कोटी ७४ लाख रूपये मंजूरी मिळाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये गेली २५ वर्षे गाजत असलेली हणबरवाडी धनगरवाडी उपसासिंचन योजना आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज पुर्णत्वास जात असून धनगरवाडी टप्पा क्रमांक १ चे काम पुर्ण झाले आहे. टप्पा क्रमांक २ चे काम प्रगतीपथावर आहे. हणबरवाडी टप्पा क्रमांक १ पुर्ण झालेला आहे. हणबरवाडी धनगरवाडी उपसासिंचन योजने साठी २०२ कोटी ७४ लाख रूपये मंजूर झाल्यामुळे हि योजना लवकरच पुर्ण होवून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार आहे. मसूर पुर्व भागाचा कायमचा दुष्काळ मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या योजनेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, मा.ना.राधाकृष्ण विखेपाटील, मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, मा.ना.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले, मा.ना.जयकुमार गोरे, मा.आ.अतुलबाबा भोसले जिल्हाध्यक्ष, मा.आ.महेशजी शिंदे, मा.कपोले साहेब, मा.जयंत शिंदे साहेब, मा. राहूल घनवट, मा.इंगूळकर साहेब यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket