वणव्यात होरपळले….. महाकाय ङोंगर वटवृक्षांवरही निसर्ग द्रोहयाची पडली नजर.
वर्ये हद्दीत झाडांना आगी लावण्याचे वाढले प्रकार, वृक्षप्रेमीतून तीव्र संताप.
वर्ये – वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष जगवत आहे पण काही निसर्गद्रोही डोंगरांना आगी लावून वृक्षांना झळ पोचवत आहेत हे विदारक चित्र निसर्ग प्रेमींसाठी खूपच संतापजनक आहे एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी झटणारी मंडळी आणि दुसरीकडे वृक्षांच्या मुळावर उठणारी मंडळी यामुळे निसर्गाचे खूप नुकसान होत आहे ऐन उन्हाळ्यात डोंगरांना वणवे लावून तेथील वृक्षांबरोबरच जीव जंतूंचेही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे निसर्गाशी द्रोह करणाऱ्या प्रवृत्ती बद्दल शासनाने कङक कायदे करूनही हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे मानवी नैतिक मूल्याचे विस्मरण झालेल्या या निसर्गद्रोह्यानी आता डोंगरांना आगी लावण्याबरोबरच मानवी जीवसृष्टीला ऑक्सिजन रुपी श्वास देणारे वटवृक्षांनाही आता लक्ष केल्याचे दिसून येत आहे वर्ये लिंबखिंड येथील डोंगरांना लागलेल्या आगीमध्ये अनेक वृक्ष होरपळून निघाले आहेत जीव जंतूंचा आश्रय असणारे हे डोंगर आता उजाड झाले आहेत वृक्ष द्रोहयाची मजल आता वटवृक्ष ना आगी लावणापर्यंत पोचले आहेत त्याचा प्रत्यय अनेकदा दिसून येत आहे वर्ये परिसरात सातारकडे येताना रस्त्यालगत असलेला महाकाय वटवृक्ष नुकताच आगीच्या भक्षस्थानी झाल्याचे चित्र दिसून येत आहे निसर्ग द्रोहयानी या वटवृक्षाला आग लावून हे झाड नष्ट केले आहे ही दुष्ट प्रवृत्ती निसर्गाला हानी पोहोचवत आहे या मार्गावरून ये जा करणाऱ्या अनेक लोकांना मायेची सावली देणारे हे वटवृक्ष आज आगीच्या भक्षस्थानी होऊन ते नष्ट झाले आहे वृक्ष द्रोहयाची मजल आता झाडांना आगी लावण्यापर्यंत पोहोचले आहेत यामुळे वृक्ष प्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जीवसृष्टीमध्ये वटवृक्षांचे मोल अनमोल आहे हे खरे तर प्रत्येकाला उमजले पाहिजे असंस्कृतपणा व निसर्गाशी प्रतारणा करणाऱ्या वृत्तीमुळे निसर्गाला मोठी हानी पोहोचत आहे वृक्षांना आगी लावणे ह्या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून मानवी जीवनासाठी ते भविष्यात घातक ठरणार आहे वणवे पेटवणारे व निसर्गाशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणं काळाची गरज आहे वृक्ष पेटवणाऱ्या प्रवृत्तीचा आता आपण निषेधच केला पाहिजे.
श्रीरंग काटेकर वृक्ष प्रेमी सातारा
