Home » राज्य » शिक्षण » ज्ञानदीप स्कूल वाई च्या कु.सज्ञा वाशिवले हिच्या स्मार्ट मल्टीपर्पज टेबल या उपकरणास राष्ट्रस्तरीय इन्स्पायर मानक ॲवार्ड

ज्ञानदीप स्कूल वाई च्या कु.सज्ञा वाशिवले हिच्या  स्मार्ट मल्टीपर्पज टेबल या उपकरणास राष्ट्रस्तरीय इन्स्पायर मानक ॲवार्ड

ज्ञानदीप स्कूल वाई च्या कु.सज्ञा वाशिवले हिच्या  स्मार्ट मल्टीपर्पज टेबल या उपकरणास राष्ट्रस्तरीय इन्स्पायर मानक ॲवार्ड

 वाई दि.-कोणत्याही देशाच्या विकासासाठी त्या देशातील वैज्ञानिक प्रगतीचे योगदान हे महत्वपूर्ण ठरते.विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे,आणि नवीन शोधांना प्रेरणा देणे, या साठी ही विज्ञान प्रदर्शने आणि इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शने आयोजित केली जातात.

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, यांच्यातर्फे इन्स्पायर ॲवार्ड मानक योजनेअंतर्गत 

11 वे राष्ट्रीय इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन दि. 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रगती मैदान दिली येथे संपन्न झाले.यामध्ये भारत देशातील एकूण 360 सहभागी उपकरणातून टॉप 31 उपकरणाची निवड झाली. त्यामध्ये ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (पसरणी,वाई)या शाळेतील विद्यार्थ्यांनी कु. सज्ञा ज्ञानदेव वाशिवले या विद्यार्थीनीने बनविलेले *स्मार्ट मल्टीपर्पज टेबल* हे उपकरण राष्ट्रीय स्तरावर विजेते ठरले. ३६० मध्ये महाराष्ट्रातून एकूण १३ उपकरणांचा सहभाग होता त्यामधून दोन उपकरणे राष्ट्रीय स्तरावर निवडण्यात आली त्यामधील सज्ञा वाशिवले हिचे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे उपकरण ठरले.दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये तिला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल सहस्त्रबुद्धे, एनआय एफ फाउंडेशन चे संचालक अरविंद रानडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकारचे संचालक डॉक्टर अभय करंदीकर, इन्स्पायर मानक भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. नमिता गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

     यावेळी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर च्या संचालिका डॉक्टर हर्षलता बुराडे , वरिष्ठ प्राध्यापक माननीय राजकुमार अवसरे, विज्ञान पर्यवेक्षक श्री राजु नेब सर, समन्वयक डॉक्टर रवींद्र भास्कर व देशभरातील सहभागी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. 

          इन्स्पायर अवॉर्ड राष्ट्रस्तरीय विजेती कुमारी सज्ञा वाशिवले तिला तिच्या यशामुळे सकुरा जपान येथे आपल्या प्रोजेक्टचे सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असल्यास कोणतीही असाध्य गोष्ट ते सहज साध्य करू शकतात आपल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून *कमी जागेत जास्त उपयोगी पडणारे उपकरण** बनवून आपल्या महाराष्ट्राचे , सातारा जिल्हा,वाई तालुका व ज्ञानदीप स्कूल पसरणी चे नाव देशात उज्वल केले. 

      ‘दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ हे दाखवून दिले.

राष्ट्रीय इन्स्पायर (National winner) ॲवार्ड विजेती कुमारी सज्ञा ज्ञानदेव वाशिवले हिला मार्गदर्शन करणारे तिचे वडिल श्री.ज्ञानदेव वाशिवले (सर) , आई सौ.सरस्वती वाशिवले ,

सातारा जिल्हा समन्वयक श्री लक्ष्मण उबाळे सर,मार्गदर्शक शिक्षिका कु.लीना जाधव यांचे ‘ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज’, पसरणी वाई च्या प्राचार्या शुभांगी पवार, विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. एकनाथ जगताप, उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत ढमाळ, सचिव श्री. बाळकृष्ण पवार, खजिनदार श्री. चंद्रकांत शिंदे, विश्वस्त श्री विश्वनाथ पवार, श्री जिजाबा पवार, श्री दत्तात्रय वाघचवरे,श्री. दिलीप चव्हाण,श्री. विजय कासूर्डे, श्री.रवींद्र केंजळे, श्री.दत्ता मर्ढेकर, श्री. दुष्यंत जगदाळे, यांनी कौतुक ,अभिनंदन केले. तिच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket