Home » राज्य » गुटखा विक्रीत सहभागी असणाऱ्या एफडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

गुटखा विक्रीत सहभागी असणाऱ्या एफडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

गुटखा विक्रीत सहभागी असणाऱ्या एफडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

 आमदार मनोजदादा घोरपडे यांची विधानसभेत मागणी

 सातारा -कराड उत्तर मतदार संघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असून सुद्धा शेजारील राज्यांमधून पोलीस व एफडीआयचे अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गुटखा महाराष्ट्रात विक्रीसाठी येत असून त्याचा जास्तीत जास्त फटका आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील लगतच्या जिल्ह्यांना बसत आहे. त्यामुळे या यंत्रणेत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी विधानसभेत मागणी केली.

       विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडणीच्या वेळी युवा पिढी गुटख्यामुळे बरबाद होत आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही पान टपरीवर गेलं तरी सहजपणे गुटखा उपलब्ध होतो. याला आळा बसला पाहिजे. गुटखा हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. तसेच एफडीए मध्ये अनेक पदे रिक्त असून ती लवकरात लवकर भरली जावीत. जप्त केलेले गुटखा तसेच इतर पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळा वाढवाव्यात. एफडीएची कारवाई करण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य मिळावे. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एफडीएच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांसाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी केली. या चर्चेमध्ये आमदार श्वेता महाले आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह सात सदस्यांनी सहभाग घेतला.

 लक्षवेधीचा इफेक्ट

आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विधानभवनामध्ये मांडलेल्या लक्षवेधीमुळे संबंधित विभागाचे उपसचिव यांच्यावर मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करत त्यांच्याकडे संबंधित विभागाचा असणारा चार्ज काढून घेण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 59 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket