अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा इन्स्टिट्यूट आणि अर्बन स्केचर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “गुलमोहर डे स्केचिंग कॉम्पिटिशन

यशोदा इन्स्टिट्यूट आणि अर्बन स्केचर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “गुलमोहर डे स्केचिंग कॉम्पिटिशन 

यशोदा इन्स्टिट्यूट आणि अर्बन स्केचर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “गुलमोहर डे स्केचिंग कॉम्पिटिशन 

बालगृह बनले सर्जनशीलतेचे खुले व्यासपीठ, मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी

सातारा : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशोदा इन्स्टिट्यूट आणि अर्बन स्केचर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “गुलमोहर डे स्केचिंग कॉम्पिटिशन 2026” चे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. १ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेला कला, सर्जनशीलता आणि निसर्ग यांचा सुंदर संगम लाभला. कार्यक्रम यशोदा इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त आर्किटेक्ट स्वराली सगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सातारा येथील बालगृह-आधारगृहाच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विस्तीर्ण वडाच्या झाडाखाली आणि फुललेल्या गुलमोहराच्या सावलीत सहभागी विद्यार्थ्यांनी आणि स्केचर्सनी आपल्या कल्पनाशक्तीला रंग दिले. ज्युनियर, सिनियर तसेच अर्बन स्केचर्स सातारा (USK) चे सहभागी अशा विविध गटांतील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, मुलांसाठी असलेले हे बालगृह त्या दिवशी सर्जनशीलतेचे खुले व्यासपीठ बनले होते. परिसरातील शांतता, निसर्गाची साथ आणि कलावंतांची एकाग्रता यामुळे प्रत्येकाने आपल्या स्केचबुकमध्ये या दिवसाचे सुंदर चित्रण केले. विविध शैलीतील रेखाचित्रे, निसर्गचित्रे आणि वास्तुशिल्पाचे बारकावे टिपणारी स्केचेस पाहून उपस्थितांनीही कौतुकाची दाद दिली.

या उपक्रमाला यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख उपस्थित आर्किटेक्ट स्वराली सगरे यांनी सहभागींचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो तसेच निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ होते. यशोदा इन्स्टिट्यूट नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून अशा उपक्रमांद्वारे कला आणि शिक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अर्बन स्केचर्स सातारा यांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेला व्यावसायिक स्पर्श लाभला. सहभागी स्केचर्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध तंत्रांची माहिती दिली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता एक शिकण्याची संधी ठरली. स्पर्धेचे परीक्षण उत्कृष्टरीत्या पार पाडल्याबद्दल जी. एस. कला महाविद्यालय, प्राचार्य मा. व्ही. आर. धुमाळ यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालगृह प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले. बालगृहाचे सचिव प्रदीप किशनराव साबळे, विश्वस्त एस. वाय. भगत आणि अधीक्षिका व्ही. एस. शिंदे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पाठिंब्यामुळे स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी नमूद केले. 

या कार्यक्रमासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या डॉ. राखी बेगमपुरे यांनीही विशेष मेहनत घेतली. एकूणच, “गुलमोहर डे स्केचिंग कॉम्पिटिशन 2026” हा उपक्रम सर्जनशीलतेचा, सामाजिक जाणिवांचा आणि निसर्गप्रेमाचा उत्कृष्ट नमुना ठरला. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेने सहभागींच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या. 

स्केचिंग ही केवळ चित्रकला नसून ती निरीक्षण, अनुभव आणि अभिव्यक्तीची प्रक्रिया आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधता येते आणि त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळते. डिजिटल युगात प्रत्यक्ष बसून केलेले रेखाटन मनाला शांतता देणारे आणि विचारांना चालना देणारे ठरते. यशोदा इन्स्टिट्यूट नेहमीच अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. भविष्यातही अशा सर्जनशील उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आर्किटेक्ट स्वराली सगरे- विश्वस्त, यशोदा इन्स्टिट्यूट

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket