प्रतापगड येथे गाईड संघटनेचे अध्यक्ष आनंद उत्तेकर सह अनेक कार्यकर्त्यांचा पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
महाबळेश्वर /प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाबळेश्वर प्रतापगड परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेच्या दरम्यान शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रतापगड या ठिकाणी उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख आनंद नारायण उत्तेकर व त्यांचे सहकारी यांनी प्रतापगड या ठिकाणी जनसंवाद यात्रेदरम्यान प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले, महाबळेश्वर व मतदार संघाच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला असून आता या पुढील काळात आपण सर्वांनी एकजुटीने या मतदारसंघात भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहावे, प्रतापगडच्या विकासासाठी व पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या गाईड यांना शासनाने दिलेल्या विशेष दर्जाबद्दल राज्य शासनाचे विशेष आभारी आहे.
यावेळी किल्ले प्रतापगड येथील गाईड संघटनेच्या वतीने पुरुषोत्तम जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी गाईड संघटनेचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून सर्व गाईड यांना मानधन सुरू करण्यात यावं याची मागणी केली. आनंद नारायण उतेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन गोविंद जाधव , शिवाजी नारायण उतेकर प्रशांत सहदेव कासूर्डे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी विजय नायडू शहरप्रमुख महाबळेश्वर तथा प्रतापगड विकास प्राधिकरण निमंत्रित सदस्य तसेच ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत गुरुजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निमंत्रित सदस्य वाई विधानसभा तसेच संजय शेलार महाबळेश्वर तालुका यांची उपस्थिती होती.
