Post Views: 39
पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वंदे मातरम गीताचे समुह गायन
सातारा दि. 7 : पोलीस मुख्यालय सातारा येथे “वंदे मातरम” गीताचे सामुहीक गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी “वंदे मातरम” गीताचे महत्व सांगून प्रास्तावीक केले. त्यानंतर वंदे मातरम गीताचे समुहगायन करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस आदी उपस्थित होते. सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “वंदे मातरम” गीताचे समुहगायन करण्यात आले त्यामध्ये सर्व पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठीत नागरिक, पोलीस पाटील, सामाजीक सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.




