वाई फेस्टिवल २०२५ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाई फेस्टिवल २०२५च्या उपक्रमांतर्गत रविवार, दि. ७/१२/२०२५ रोजी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई आणि वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वेलनेस फॉरेवर फार्मसी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या विशेष उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार भाऊ गोरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गोरे यांनी भेट देऊन विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी वातावरण लाभले. वाई फेस्टिवल चे अध्यक्ष श्री संजय वाईकर सर यांनी त्यांचे स्वागत केले. त्या प्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. प्रकाश पवार व मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वाईकरांनी केलेल्या या सहभागाचे मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. शिबिराचे आयोजन सुरळीत आणि यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था, वाई जिमखाना, वेलनेस फॉरेवर फार्मसी तसेच सर्व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामुळे वाई फेस्टिवल २०२५चा सामाजिक अंग मजबूत होत असून, “रक्तदान हेच महान दान” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला.




