गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी,
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकत्र दिसले आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, या जोडप्याने गणपती बाप्पाचे एकत्र स्वागत केले आणि मीडिया ला मिठाई वाटली. इतकेच नाही तर दोघांनीही एकत्र पोज देखील दिल्या. अलीकडेच सुनीता आहुजाने गोविंदावर ‘फसवणूक’ केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुनीता आणि गोविंदा एकत्र दिसले आहेत.





