- पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेस समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तुळजापूर यांची सदिच्छा भेट
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली, विनम्र व तत्पर सेवा याविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तुळजापूर पतसंस्थेचे व्हा.चेअरमन-श्री. श्रीकांत दिनानाथ भोजने, संचालक-श्री. शिवाजी दगडू गायकवाड, व्यवस्थापक-श्री. सज्जनराव मोहनराव जाधव, क्लार्क – श्री. अभिजीत अंकुश म्हेवे, श्री. सुनिल सुरेश शेेरेकर, पिग्मी एजंट – श्री. जावेद मुबारक शेख, श्री. आशपाक मुबारक सय्यद, श्री. श्रीनिवास खंडेराव मुळे, श्री. मधुकर नानासाहेब साळवे यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी उत्कर्ष पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती अनुराधा कोल्हापुरे व मुख्य व्यवस्थापक – श्री. प्रकाश पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बैंकिंग, सेल्फ बैंकिंग, व्हाऊचरलेस बैंकिंग, उत्कर्ष रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग असे पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच व्यवसाय वाढीसाठी व ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा, ज्येष्ठ नागरिकांना घरपोहोच मोफत सेवा या विषयी माहिती दिली.
त्याप्रसंगी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थमार्फत चेअरमन, श्रीमती अनुराधा कोल्हापुरे व मुख्य व्यवस्थापक श्री. प्रकाश पवार यांनी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था यांचा सत्कार करून आभार मानले.
तसेच उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेना ग्राहकांना विशेष फायदा व्हावा यासाठी ठेवीवर ज्यादा परतावा देणारी आनंद ठेव योजना सुरू केली आहे. सदर आनंद ठेव योजनेमध्ये ग्राहकांना 10% व्याजदर द.सा.द.शे. देण्यात येत आहे. तरी सदर योजनेचा सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले.