विकासदृष्टी असलेले नेतृत्व : माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पाचगणी प्रतिनिधी -पाचगणी शहराच्या विकासात दूरदृष्टी, नियोजन आणि जनसंपर्क यांचा सुंदर संगम घडवणारे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. सामाजिक, राजकीय आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी पाचगणी शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सन 2007 मध्ये नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शहराचा विकास आराखडा तयार करून भविष्यातील वाढ लक्षात घेऊन नियोजनबद्ध कामे राबवली. शहरातील व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी शॉपिंग सेंटर विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.
याचबरोबर शहरातील ड्रेनेज व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच रस्त्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करत पायाभूत सुविधांना गती दिली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांना चालना मिळाली आणि पाचगणी शहराच्या सुशोभीकरणात मोठे योगदान झाले.
राजकारणात सातत्याने जनतेशी नाळ जोडून ठेवणारे शेखर कासुर्डे यांनी 2025 मध्ये नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी विजय मिळवत आपल्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली. सामान्य नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणारे, विकासकामांवर भर देणारे आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आदर्श नगरसेवक म्हणून त्यांचा जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला आहे.
सामाजिक बांधिलकी, विकासाची तळमळ आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे शेखर कासुर्डे हे पाचगणीतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




