कराटे स्पर्धेत सुखात्मे स्कूलचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे व रणजीत पवार यांना सुवर्णपदक
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी सह रौप्यपदक ही पटकविले. स्पर्धेमध्ये 400 खेळाडूंचा सहभाग, गौरीशंकरचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक उंचाविला.
लिंब- कोल्हापूर येथे चाणक्य आर्ट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंबचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे याने 11वर्ष वयोगटात झालेल्या स्पर्धेत नेत्रदीपक खेळ करून कांता इव्हेंट या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला तर कुमिते म्हणजेच फाईट इव्हेंट प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदकही पटकावले तर याच स्कूलचा विद्यार्थी रणजीत पवार यांने वयोगट 12 वर्ष मध्ये कांता इव्हेंट प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त केले तर कुमिते म्हणजेच फाईट इव्हेंट मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदक प्राप्त केले. कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धात गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अखेर बाजी मारली. विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल नुकताच या विद्यार्थ्यांचा सत्कार गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, नितीन शिवथरे,अमित मडके,आरती चव्हाण,शितल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना क्रीडा खेळात ही कौशल्य दाखवून चमकदार कामगिरी करीत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. एकाच स्कूलमधील दोघांना सुवर्णपदक व रौप्यपदक मिळाले याचा आम्हाला आनंद होत आहे.
प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की, राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या क्रीडा परंपरेला साजेसे कार्य करून स्कूलच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक संतोष माने यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर ,कायदेशीर मॅनेजर रवी जगताप तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
