Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सर्व सामान्य जनतेचा पर्मनंट आमदार -जयकुमार गोरे

सर्व सामान्य जनतेचा पर्मनंट आमदार -जयकुमार गोरे 

सर्व सामान्य जनतेचा पर्मनंट आमदार -जयकुमार गोरे 

सातारा (अली मुजावर )-सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला सलग ३ वेळा आमदार म्हणून खटाव-माणच्या जनतेनं निवडून दिले आहे. लाखो शेतकऱ्यांचा सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आमदार जयकुमार गोरे यांच्या वरती असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे चौकार लगावणार आहेत असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.माण – खटावच्या जनतेचा दुष्काळी प्रश्न निकालात काढण्याचे काम खऱ्या अर्थाने आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. जनतेला दिलेला शब्द आ.जयकुमार गोरे यांनी वेळोवेळी पूर्ण करत ते माण खटाव च्या जनतेच्या हृदयात विराजमान आहेत. जलक्रांती घडवून आणण्याबरोबरच येणाऱ्या काळात माण खटाव मध्ये औद्योगिक व शैक्षणिक क्रांती घडवायचा निर्धार आमदार जयकुमार यांनी व्यक्त केला असून येणाऱ्या काळामध्ये माण खटाव परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्र तयार झाल्याने परिसरामध्ये तरुण-तरुणींना रोजगाराची दारे खुली होणार आहेत. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जयकुमार गोरे माण खटाव चा निश्चितच कायापालट करताना दिसून येत आहेत.

 ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत म्हसवड येथे MIDC उभी करुन बेरोजगारी हटविण्यासाठी आम्ही औद्योगिक क्रांतीची बीजे रोवत आहोत असे पाणी योजनांच्या जलक्रांतीनंतर आता मी औद्योगिक क्रांती साधणार आहे.मी जनतेची सेवा करतोय, दिलेले शब्द पूर्ण करतोय त्यामुळे मी निवडणूकीत उभा राहिलो कि आमदार नक्कीच होणार आहे असा आत्मविश्वास जयकुमार गोरे व्यक्त करतात.

आ.गोरे हे गत १५ वर्षापासुन माण – खटावचे प्रतिनिधीत्व करीत असुन त्यांनी आजवर विविध विकासकामे करताना माण खटावला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे, माणची माणगंगा व खटावची येरळा नदी भरभरुन वाहत असल्याचे चित्र आहे. आ.गोरे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता अशी सर्वसामान्य जनतेची धारणा असल्यानेच सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर आ.गोरेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सामान्य जनतेला नेमके काय हवे आहे, त्यांच्या समस्या काय आहे याची नेमकी माहिती आ.गोरेंना असल्यानेच सामान्य जनता त्यांच्यावर अतूट प्रेम करत आली आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket