अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल –

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल –

स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल –

वाई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या गौरवशाली पर्वानिमित्त राष्ट्रप्रेमाचा जागर करणाऱ्या देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता, सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, मधली आळी, वाई येथे हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.

स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांना संगीतमय मानवंदना देण्याबरोबरच नव्या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाभिमानाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सागर वैराट व त्यांच्या टीमकडून देशभक्तीपर गीतांचा बहारदार नजराणा सादर केला जाणार आहे. त्यांच्यासमवेत गायिका तेजस्विनी पोरे आणि गायिका प्रियांका कदम-भिलारे व डॉ. शस्मिता जैन करणार असून, लाईव्ह बँडच्या साथीने सादर होणाऱ्या गीतांमुळे उपस्थितांना राष्ट्रप्रेमाची अनोखी सांगीतिक अनुभूती मिळणार आहे.

आर्थिक क्षेत्रातील विश्वासार्ह सेवेसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा उत्कर्ष पतसंस्थेचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सूर देशभक्तीचे… स्वर राष्ट्रप्रेमाचे… आणि मानवंदना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला!’ या भावनेतून रंगणाऱ्या या सांगीतिक सोहळ्यास वाई शहर व परिसरातील नागरिक, युवक-युवती आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket