जी.डी.सी.ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा २६ ते२८ मे
सातारा : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.ॲण्ड ए बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) परीक्षा-२०२६ व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-२०२६, दिनांक २६, २७ व २८ मे, २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
जी.डी.सी.ॲण्ड ए व सी.एच.एम. परीक्षा २०२६ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.१३ मार्चपर्यंत करण्यात आलेली आहे. तरी सदरबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.




